महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 | Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2024

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 | Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2024 –

    आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतामधील असंख्य लोक शेती हा व्यवसाय करतात परंतु यामध्ये सुद्धा काही शेतकरी असे असतात की जे फक्त त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापूरतेच पैसे कमावू शकतात तर काही शेतकरी ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ते जास्त पैसा कमावू शकतात किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. परंतु ज्या लोकांकडे कमी जमीन आहे असे शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापूरतेच कमावू शकतात परंतु अशा मध्ये जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा इतर समस्या आल्या तर खूप मोठे नुकसान अशा शेतकऱ्यांना झेलावे लागते आणि काही शेतकऱ्यांवर कर्ज जर असेल किंवा इतर काही आर्थिक परिस्थितीमुळे ते अडकलेले असतील तर आत्महत्या सुद्धा करतात.महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेबद्दल माहिती आज बघणार आहोत…

Mahatma Phule Loan Waiver Scheme

– ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे.

– महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.

– या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.

– अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसोबतच राज्यातील फळे , ऊस व इतर पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असून बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज माफ होऊ शकते.

– राज्य सरकारद्वारे कर्जमुक्तीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल. 

– शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यरत सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाईल.

– राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

– जर शेतकरी इतर काही काम करत असेल किंवा सरकारी नोकरी करत असेल किंवा कर भरत असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

–  ऊस, फळे किंवा इतर पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

– या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

– अर्जदाराचे आधार कार्ड

– रहिवासी प्रमाणपत्र

– बँक खाते पासबुक

– मोबाईल नंबर

– पासपोर्ट साईज फोटो

– पात्र शेतकऱ्यांनी किंवा अर्जदारांनी ज्या बँकेमार्फत कर्ज घेतले आहे त्या ठिकाणावरून सुद्धा चौकशी करू शकतात किंवा पुढे दिलेल्या लिंक वरून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी या योजनेबाबत अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता.

 येथे क्लिक करा.

https://mjpsky.maharashtra.gov.in/index.html

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक मध्ये⭕ जवळपास 18 रस्ते बंद…👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://www.viral-talk.in/pm-narendra-modi-nashik-visit/?amp=1: महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 | Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2024

Leave a Comment