पोस्ट ऑफिस विमा योजना २०२३  | Post Office Insurance Scheme 2023 –

पोस्ट ऑफिस विमा योजना २०२३  | Post Office Insurance Scheme 2023 –

     सगळ्यांनाच स्वतःच्या जीवाची काळजी असतेच ,परंतु त्यासोबतच प्रत्येकालाच प्रत्येकाच्या कुटुंबाची सुद्धा खूप काळजी असते. कधी कोणते संकट चालून येईल हे काही सांगता येत नाही आणि म्हणूनच योग्य त्यावेळी विमा काढून ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून आपल्याला स्वतःला काही झाल्यास त्यामागून आपल्या कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचे हाल होऊ नये. परंतु काही विमा खूपच महाग असतात परंतु आज अशा एका योजनेबद्दल माहिती बघणार आहोत की ज्यासाठी फक्त ३९९ रुपये इतका खर्च ( प्रीमियम ) येणार आहे ती योजना आहे, ” पोस्ट ऑफिस विमा योजना २०२३”.

Advertisement

 पोस्ट ऑफिस विमा योजना २०२३ ही वार्षिक प्रीमियम २९९ आणि ३९९ रुपये अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

·         ३९९ रुपयाच्या विमा योजनेमध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमाधारकाच्या दोन मुलांना एक लाखापर्यंत शिक्षणाचा खर्च मिळू शकतो.

·         ३९९ रुपयाच्या विमा योजनेमध्ये अंत्यसंस्कार खर्च ,दवाखाना खर्च आणि शिक्षण खर्च मिळतो परंतु २९९ रुपये प्रीमियम मध्ये हा सर्व लाभ मिळत नाही.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचे फायदे | Benefits of Post Office Insurance Scheme –

  • अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये
  • अपघातामुळे कायमस्वरूपीचे अपंगत्व १० लाख
  • दवाखान्याचा खर्च ६० हजार रुपये
  • मुलाच्या शिक्षणासाठी- १ लाख रुपये प्रति मुल (जास्तीत जास्त दोन मुले)
  • ऍडमीट असेपर्यंत रोज १ हजार रुपये (१० दिवसापर्यंत)
  • ओ पी डी ( OPD ) खर्च -३० हजार रुपये
  • अपघाताने पॅरॅलिसिस झाल्यास- १० लाख रुपये
  • कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च २५,०००/- रुपये    

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता | Eligibility for Post office Insurance –

  • पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे.
  • पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते असणे ,पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी आवश्यक आहे.
  • पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी प्रति वर्ष ३९९ रुपये किंवा २९९ भरावे लागणार आहेत. परंतु ३९९ रुपये भरून ही योजना सुरू केल्यामुळे जास्तीचे लाभ मिळतात.

पोस्ट ऑफिस विमा योजनेचा कालावधी | Duration of Post Office Insurance Scheme –

  • पोस्ट ऑफिस विमा योजनेचा एकुण कालावधी हा एक वर्ष असणार आहे.
  • विमा धारकास दर एक वर्षानंतर आपल्या विम्याचे पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन नुतनीकरण करणे गरजेचे राहील.

पोस्ट ऑफिस विमा योजना अर्ज | Post Office Insurance Scheme Application –

  • पोस्ट ऑफिस विमा संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला हवी असणारी माहिती मिळवा.
  • पोस्ट ऑफिस विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये बँक खाते उघडणे गरजेचे आहे.
  • नंतर पोस्ट ऑफिस मधून एक कार्ड सुद्धा मिळेल.           
  • या कार्डचा उपयोग भविष्यामध्ये विम्याचा लाभ मिळवण्यासाठी होईल.

आपण हे देखील वाचू शकता...प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 

Advertisement

Leave a Comment