शून्य रु सुरु करा घरबसल्या बिझनेस । Print on Demand । Home Based Business ideas in Marathi

आपण जे शंभर दिवसांमध्ये शंभर इन्कम आयडिया असे चॅलेंज घेतले आहे त्याला सुरुवात झालेली असून वेगवेगळ्या शंभर अशा इन्कम आयडिया बद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया…

    आज आपणचा इन्कम आयडिया बद्दल बोलणार आहोत ती म्हणजे print on demand Store….

 Print on Demand । Home Based Business ideas in Marathi
Advertisement

what is Print on Demand Store in Marathi? काय आहे प्रिंट ऑन डिमांड स्टोअर ?

 • नक्की काय आहे प्रिंट ऑन डिमांड स्टोअर ?
 • हल्ली प्रिंट ऑन डिमांड या गोष्टीला खूप वाव आहे. प्रिंट ऑन डिमांड हा असा व्यवसाय आहे की जो कमी खर्चामध्ये आणि घरबसल्या सुद्धा करता येऊ शकतो. 
 • प्रिंट ऑन डिमांड म्हणजे text,images किंवा ग्राफिक्स अशा वेगवेगळ्या डिझाइन्स तयार करून विविध प्रॉडक्ट्स वर प्रिंट करून देणे होय.
 • यामध्ये आपले काम फक्त टेक्स्ट किंवा इमेजेस किंवा ग्राफिक्स डिझाईन करणे हे असणार असून यामध्ये कुठल्याही प्रॉडक्ट्सचा स्टॉक करून ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच प्रिंट ऑन डिमांड स्टोअर सुरू करण्यासाठी आपल्याकडे कुठल्याही ठराविक अशी जागेची आवश्यकता नाही.
 • प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये आपल्याला फक्त योग्य त्या प्रॉडक्ट साठी योग्य त्या सप्लायर्सची निवड करणे गरजेचे आहे कारण ज्यावेळी आपण प्रॉडक्टवर डिझाईन केलेले इमेजेस वेबसाईटवर अपलोड करतो त्यावेळी कस्टमरने तो प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर कस्टमर पर्यंत तो प्रॉडक्ट पोहोचवण्याची जबाबदारी त्या सप्लायर्सची असते.

चला तर जाणून घेऊया प्रिंटन डिमांड हा व्यवसाय कसा सुरु करावा आणि या व्यवसायाचे कार्य नेमकी कशा प्रकारे चालते ?

How to Start Print On Demand Store From Home ?

 • स्टेप : तुमचे डिझाईन असलेले प्रॉडक्ट्सची विक्री कुठे करणार आहात हे ठरवा.
 • तुम्ही बनवलेल्या डिझाईनची प्रिंट असणारे प्रॉडक्ट विक्री करण्यासाठी तुम्ही एक तर स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता किंवा इतर ई-कॉमर्स वेबसाईटवर या प्रॉडक्टची विक्री करू शकता.
 • जर तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर प्रॉडक्टचे मार्केटिंग किंवा प्रमोशन करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर साऱ्या संधी उपलब्ध असतील परंतु स्वतःची वेबसाईट तयार करून ही वेबसाईट ग्रो होण्यासाठी थोडासा कालावधी लागू शकतो.
 • दुसरा मार्ग म्हणजे पहिल्यापासूनच अस्तित्वात असलेल्या चांगल्या ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही बनवलेले डिझाईन प्रिंट असलेले प्रॉडक्ट लिस्टिंग करून विक्री करू शकता. अशाप्रकारे विक्री जास्त लवकर होऊ शकते कारण या वेबसाईटवर पहिल्यापासूनच चांगले ट्रॅफिक असते.
 • स्टेप : कोणत्या प्रॉडक्ट वर तुम्ही बनवलेले डिझाईन प्रिंट करणार आहात हे ठरवा.
 • हल्ली विविध डिजाईनचे किंवा catchy वर्ड्स असणारे टी-शर्ट घालण्याची फॅशन असून हे फक्त टी-शर्ट पुरतच मर्यादित राहिलेले नसून वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स वर सुद्धा आकर्षक अशा डिझाईन किंवा टेक्स्ट प्रिंट करून आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्र-मैत्रिणींना गिफ्ट म्हणून हे प्रॉडक्ट्स दिले जातात. या प्रॉडक्ट्समध्ये बॅक पॅक्स, फोन केसेस , बॅग्स,मग, सॉक्स, योगा मॅट्स, ब्लूटूथ स्पीकर्स यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश होतो.
 • स्टेप : सप्लायर्सची योग्य निवड करणे.
 • प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायामध्ये सप्लायरची योग्य निवड ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या ठिकाणी प्रॉडक्ट वर असणारे डिझाईन तर तुम्ही बनवत असता परंतु इतर सर्व प्रक्रिया म्हणजेच प्रॉडक्ट वर ती डिझाईन प्रिंट करण्यापासून ते ग्राहकाने मागवलेला प्रॉडक्ट ग्राहकास घरपोच पोहोचवण्यापर्यंत हे काम सप्लायर करत असतात. त्यामुळे सप्लायरची चुकीची निवड या व्यवसायासाठी घातक ठरू शकते.
 • स्टेप : कोणत्या डिझाईन तयार करणार आहात, हे ठरवा.
 • मार्केट स्टडी करून मार्केटमध्ये ग्राहकांना कशा प्रकारच्या डिझाइन्स जास्त आवडतात याचा अभ्यास करा आणि त्यानुसार युनिक आणि आकर्षक अशा डिझाईन बनवा.
 • तुम्हाला स्वतःला जर डिझाईन करणे जमत नसेल परंतु या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती असेल तर तुम्ही एखादा प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर सुद्धा hire करू शकता.
 • तसेच 99designs ,upwork,fiverr यांसारख्या वेबसाईटची मदत सुद्धा घेऊ शकता.
 • स्टेप : प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग कशी कराल?
 • कुठलाही व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायाची योग्य रीतीने मार्केटिंग करणे खूप गरजेचे असते. प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग पुढील प्रकारे करता येऊ शकते :
 • सोशल मीडिया मार्केटिंग

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तुम्ही प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग करून जास्तीत जास्त कस्टमर्स मिळू शकतात.

 • इन्फ्लुएन्सर मार्केटिंग

एखाद्या चांगल्या इन्फ्लुएन्सर कडून तुमच्या प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग करून घेऊ शकता.

 • कंटेंट मार्केटिंग

विविध प्रॉडक्ट रिव्ह्यूज देऊन यामध्ये सुद्धा प्रिंट ऑन डिमांड या व्यवसायाची मार्केटिंग करता येऊ शकते.

which are the best Platform for Print on Demand Store ?

 • प्रिंट ऑन डिमांड हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही बेस्ट वेबसाईटस् पुढील प्रमाणे आहेत
 • Printify
 • Printful
 • Sellfy
 • Gelato
 • Customcat

जॉईन करा Whatsapp – https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुप- https://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा- https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईट- https://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी- https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब- https://yt.openinapp.co/iconikMarathi

HOW PRint on Demand works-

वरील वेबसाईट पैकी printify या वेबसाईटवरून अर्निंग कशी करता येईल हे जाणून घेऊयात ….

.Sign up: 

 • सर्वप्रथम printify ही वेबसाईट ओपन करा.
 • त्यानंतर या वेबसाईट वर साइन अप करा.
 • पुढे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि नंतर लगेच अकाउंट ओपन होईल.
 • Printify ला तुम्ही इतर ठिकाणी बनवलेले स्टोअर्स उदाहरणार्थ Etsy, Shopify यावरील स्टोअर अटॅच करू शकता. त्यासाठी तिथे ऑप्शन येईल समजा तुम्हाला Etsy स्टोअर अटॅच करायचे असेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर साइन इन करा.
 • यानंतर प्रॉडक्ट रिसर्च करणे महत्त्वाचे आहे.
 • प्रॉडक्ट रिसर्च झाल्यानंतर त्या प्रॉडक्टवर आकर्षक अशी डिझाईन तयार करा यासाठी विविध वेबसाईटची मदत तुम्ही घेऊ शकता तसेच canva वर सुद्धा उत्तमरीत्या तुम्ही डिझाईन बनवू शकता.
 • डिझाईन तयार करून झाल्यानंतर start selling या ऑप्शन वर क्लिक करा नंतर तुम्हाला ज्या प्रॉडक्ट वर डिझाईन करायची आहे तो प्रॉडक्ट सिलेक्ट करून print provider सिलेक्ट करा.

.Start designing –

प्रॉडक्ट सिलेक्ट झाल्यानंतर तो प्रॉडक्ट डिझाईनिंग करण्यास सुरुवात करा.

. Publish –

प्रॉडक्ट डिझाईन करून झाल्यानंतर तयार झालेला प्रॉडक्ट पब्लिश करा.

. Earn –

एकदा की तुम्ही डिझाईन केलेला प्रॉडक्ट सेल झाला की त्यानंतर तुम्हाला अर्निंग होण्यास सुरुवात होईल.

   अकाउंट ओपन केल्यानंतर पुढील प्रोसिजर कशी कशी असेल याबद्दलची माहिती आपोआपच तुम्हाला मिळत जाईल.

watch Full details Video-

Advertisement

Leave a Comment