खुशखबर! रिलायन्स जिओ नवीन ‘क्लाउड’ लॅपटॉपवर काम करत आहे ज्याची किंमत सुमारे 15,000 रुपये आहे…..

        मुकेश अंबानीं यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ हे एक शक्तिशाली आणि सगळ्यांना घेता येऊ शकेल असा लॅपटॉप ‘क्लाउड’ लॅपटॉप आपल्या भारतामध्ये लॉन्च करण्यावर काम करत आहे. जिओ ownership कॉस्ट कमी करण्याच्या उद्देशाने देशात ‘क्लाउड’ लॅपटॉप लॉन्च करण्यावर काम करत आहे. देशात लॅपटॉप लॉन्च करण्यासाठी ही कंपनी HP, Acer आणि Lenovo सारख्या उत्पादकांशी बोलणी करत असल्याची सुद्धा माहिती आहे.

Advertisement

    बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदी करणे शक्य होत नाही परंतु आता अवघ्या पंधरा हजार रुपयांमध्ये लॅपटॉप मार्केटमध्ये येऊ शकतो आणि हे रिलायन्स जिओ मार्फत घडण्याची शक्यता आहे कारण रिलायन्स जिओ “क्लाऊड लॅपटॉप” वर काम करत आहे आणि त्याची किंमत सुमारे पंधरा हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात क्लाऊड लॅपटॉप म्हणजे नेमकी काय…?

क्लाऊड लॅपटॉप | Cloud Laptop –

– ट्रॅडिशनल लॅपटॉप मध्ये असणारे प्रोसेसिंग आणि स्टोरेज फंक्शन्स क्लाऊड वर हलवतात, या ठिकाणी क्लाऊडचा उपयोग केला जातो म्हणूनच या लॅपटॉपला क्लाऊड लॅपटॉप असे म्हटले जाते.

– परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की ,क्लाऊड लॅपटॉप ऑपरेट करण्यासाठी कंटिन्यू इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

– या लॅपटॉप ची किंमत इतर लॅपटॉप पेक्षा नक्कीच कमी असणार आहे, त्यामुळे याचा फायदा कित्येकांना घेता येणार आहे.

क्लाउड लॅपटॉपचे फायदे | Advantages of cloud laptop –

– क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे लॅपटॉपची आगाऊ किंमत मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.

– कुठलेही हार्डवेअर अपग्रेड न करता युझर्स त्यांच्या आवश्यकतेनुसार वर्किंग करू शकता.

– कमी किमतीमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध होणार असल्यामुळे कित्येक जण हा लॅपटॉप खरेदी करू शकतात.

– अगदी कुठेही Accessibility कोणत्याही device सोबत..

– कित्येक सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरपासून फ्री होण्याची क्षमता

– सेंट्रलाइजड डेटा सेक्युरिटी

– हाय परफॉर्मन्स 

Subscription model | सबस्क्रीप्शन मॉडेल –

– जिओ सुद्धा मंथली क्लाऊड सबस्क्रीप्शन मॉडेल ऑफर करण्याची योजना आखत आहे, हे सुद्धा त्यांच्याद्वारे लवकरच जाहीर केले जाऊ शकते.

– हे क्लाऊड सबस्क्रीप्शन विविध जिओ सर्विसेस उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

अशा रीतीने लवकरच जिओचा ” क्लाऊड लॅपटॉप ” लॉन्च होऊ शकतो.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version