Shikau Umedwari Yojana | शिकाऊ उमेदवारी योजना | शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायामध्ये तसेच आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी | NAPS  Scheme | MAPS Scheme | Best Government Schemes  2025

Shikau Umedwari Yojana | शिकाऊ उमेदवारी योजना | शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायामध्ये तसेच आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी | NAPS  Scheme | MAPS Scheme | Best Government Schemes  2025

    शिकाऊ उमेदवारी योजना नक्की काय आहे, या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये तसेच शिकाऊ उमेदवारीचे प्रकार, व्यवसाय अभ्यासक्रम गट, शैक्षणिक पात्रता अशी सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

Shikau Umedwari Yojana | शिकाऊ उमेदवारी योजना | शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायामध्ये तसेच आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी | NAPS  Scheme | MAPS Scheme | Best Government Schemes  2025

Shikau Umedwari Yojana
Shikau Umedwari Yojana

Shikau Umedwari Yojana Main Features| शिकाऊ उमेदवारी योजनेचे उद्दिष्ट 

– शिकाऊ उमेदवारी योजना हे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आवश्यकतेनुसार कुशल असे मनुष्यबळ तयार करण्यासाठी एक प्रभावी असे साधन आहे. 

– प्रशिक्षणार्थींना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञान तसेच प्रक्रियेमधील विविध गोष्टी या शिकवल्या जातात आणि यामुळे प्रशिक्षित झालेले कर्मचारी हे अधिक कार्यक्षमतेने आणि जलद गतीने काम करतात आणि याचा उपयोग उद्योगाची उत्पादन क्षमता वाढवण्यामध्ये होतो. 

– वेगवेगळ्या उद्योगांना हवे तसे कुशल कामगार या अंतर्गत मिळतात त्यामुळे भरतीसाठी होणारा अतिरिक्त खर्च सुद्धा टाळता येतो आणि कुशल कामगार सुद्धा मिळतात. 

– शिकाऊ उमेदवारी योजनेमुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. 

– या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी नवीन तंत्रज्ञान शिकतात आणि याचा उपयोग करून वेगवेगळ्या कल्पना ते अमलात आणू शकतात. 

– यासाठी किमान 14 वर्षे वय पाहिजे तर कमाल वयाची कोणतीही अट नाही परंतु जर राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशावेळी मात्र कमाल वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे. 

– भारत सरकारची राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना आणि महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना या अंतर्गत शिकाऊ उमेदवारी योजनेला चांगल्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते. 

Shikau Umedwari Yojana Vidyavetan| शिकाऊ उमेदवारी योजना विद्या वेतन –

महाराष्ट्र राज्याने अधिसूचित केल्यानुसार, 

  • प्रथम वर्षात अर्धकुशल कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रशिक्षणाच्या 70%, 
  • दुसऱ्या वर्षामध्ये 80%, 
  • तर तिसऱ्या वर्षात 90%. 
  • रोज कमीत कमी चार तास पार्ट टाइम प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना नमूद केलेल्या विद्या वेतनाच्या 50% इतके विद्यावेतन असेल. 

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण पंधराशे रुपये व महाराष्ट्र शिकवू उमेदवार प्रोत्साहन योजनेअंतर्गत एकूण साडेतीन हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये प्रत्येक उमेदवाराला दरमहा प्रोत्साहन पर डीबीटी मार्फत नामनिर्देशित आणि ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिकाऊ उमेदवारांना विद्या वेतनाचे वाटप करण्यात येते.

निवड :

उद्योगांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची नोंदणी व निवड ही अप्रेंटिसशिप पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. 


सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी अधिकृत पोर्टल :

  • इच्छुक उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी जिल्ह्यामधील संबंधित मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक सूचना केंद्र त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची संपर्क साधावा. 
  • 1 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये वेळोवेळी संबंधित मूलभूत प्रशिक्षण तथा आनुषंगिक मध्ये होणाऱ्या विविध भरती मेळाव्यांसाठी उपस्थित रहावे.
  • www.dvet.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र मधील व्यवसाय निहाय तसेच जिल्हा निहाय आस्थापनांची यादी आणि भरती मेळाव्याचे कार्यक्रम याबद्दल माहिती उपलब्ध आहे.

विद्या वेतन प्राप्त करण्यासाठी अर्ज –

  • ज्या उमेदवारांनी 3 जून 2021 पासून शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केले आहे किंवा सध्या पूर्ण करत आहेत अशा उमेदवारांनी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी https://maps.dvet.gov.in  या पोर्टलवर नोंदणी करावी आणि या योजनेअंतर्गत दरमहा विद्या वेतन मिळवण्यासाठी अर्ज करावेत.
  • नोंदणी किंवा अर्ज करत असल्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास उमेदवार संबंधित आस्थापनांशी किंवा संबंधित मूलभूत प्रशिक्षण किंवा आनुषंगिक सूचना केंद्रांशी संपर्क साधू शकतात.

शिकाऊ उमेदवारीचे प्रकार, व्यवसाय अभ्यासक्रम गट आणि शैक्षणिक पात्रता :

क्रमांक शिकाऊ उमेदवारीचे प्रकारव्यवसाय अभ्यासक्रम गट शैक्षणिक पात्रता
1नामनिर्देशित व्यवसाय अभ्यासक्रम अभियांत्रिकी उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम, मुद्रण, हॉटेल व केटरिंग, रिटेल, आयटी आणि सॉफ्टवेअर, आरोग्य सेवा, पारंपारिक आणि अपारंपारिक व्यवसाय अभ्यासक्रम, कृषी आणि अन्नप्रक्रिया, नवीन तंत्रज्ञान व सेवा क्षेत्र इत्यादी.औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण, फ्रेशर शिकाऊ उमेदवारीसाठी इयत्ता आठवी, दहावी, बारावी व बीएससी उत्तीर्ण. 
2ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रम पाचवीपासून पुढे कोणतीही शैक्षणिक अर्हता 
3पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवी स्तरावरील सर्व अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण 
4तंत्रज्ञ अभियांत्रिकी पदवी स्तरावरील सर्व अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण 
व्यवसाय अभ्यासक्रम तंत्रज्ञ १०+२ स्तरावरील सर्व व्यवसाय अभ्यासक्रम गट १०+२ व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण
व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment