Unique career options after 12th | बारावी नंतर युनिक करिअर ऑप्शन्स | Unique career options after 12th arts, commerce and science –
आपण असे लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की आपल्या आयुष्यामध्ये दहावी आणि बारावीचे वर्ष खूप महत्त्वाचे असते आणि तसे असते सुद्धा कारण बारावीनंतरच आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहोत हे ठरवतो आणि त्यानुसार पुढील आयुष्यामधील आपले करिअर ठरले जाते. बारावी झाल्यानंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत ,त्यामध्ये काही पारंपारिक मार्ग आपल्याला माहीतच आहेत. परंतु जरा हटके आणि आकर्षक असणारे पर्याय तसेच आपल्या आवडी, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे पर्याय निवडले तर नक्कीच आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकू. यासाठीच आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही युनिक करिअर ऑप्शन्स ( Unique career options after 12th ) बघणार आहोत की जे आपण बारावी नंतर करू शकतो. चला तर सुरुवात करूयात…
Unique career options after 12th arts | बारावी आर्ट्स नंतर युनिक करिअर ऑप्शन्स –
Advertisement
Table of Contents
Unique career options after 12th
१.थ्रीडी ॲनिमेशन अँड व्ही एफ एक्स 3D Animation & VFX –
डिजिटल मार्केटिंग हल्ली मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामुळेच थ्रीडी ॲनिमेशन आणि व्ही एफ एक्सला खूप संधी आहे. आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कुठल्याही फॅकल्टी मधून अकरावी – बारावी केली असेल तरीसुद्धा हा कोर्स करता येतो.
२.इव्हेंट मॅनेजमेंट ( Event management ) –
– हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे कारण हल्ली इव्हेंटची संख्या तर वाढली आहे परंतु सर्वच लोक इतके बिझी झाले आहेत की स्वतः कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा म्हटलं तर पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळेच बरेच लोक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्याशी संपर्क साधून इव्हेंट ऑर्गनाईज करून घेतात. बारावी झाल्यानंतर फुल टाइम मॅनेजमेंट कोर्स करता येऊ शकतो.
नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत :
– इव्हेंट प्लॅनर Event Planner
– वेडिंग प्लॅनर Wedding Planner
– स्टेज डेकोरेटर Stage decorator
– एक्झिबिशन ऑर्गनायझर Exhibition Organiser
– इव्हेंट मॅनेजर Event Manager
३.बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग ( Bachelors in fashion designing ) –
बारावीनंतर तीन ते चार वर्षाचा बॅचलर्स इन फॅशन डिझाइनिंग असा कोर्स आहे ,ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स फायदेशीर आहे. यामध्ये कपडे, फुटवेअर तसेच ज्वेलरी यांसारख्या डिझाईन कशा करता येतील याचे ज्ञान दिले जाते. हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी उपलब्ध आहेत.
– फॅशन डिझायनर Fashion Designer
– फॅशन स्टायलिस्ट Fashion Stylist
– फॅशन कन्सल्टंट Fashion consultant
– डिझाईन मॅनेजर Design Manager
– टेक्स्टाईल डिझायनर Textile designer
– गारमेंटस् सॅम्पल कॉर्डिनेटर Garments sample coordinator
४. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( Bachelor of hotel management ) –
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या कोर्समध्ये कम्युनिकेशन स्किल्स तसेच कस्टमर सर्विस व आदरातिथ्य कशाप्रकारे करायचे यांसारखे अनेक कौशल्य शिकवले जातात. बारावीनंतर बॅचलर्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा तीन ते चार वर्षांचा पदवी कोर्स आहे.
नोकरीच्या संधी :
– हॉटेल मॅनेजर Hotel Manager
– ऍकोमोडेशन मॅनेजर Accommodation Manager
– फूड अँड बेवरेज मॅनेजर Food and Beverage Manager
– एरिया रिटेल मॅनेजर Area Retail Manager
-जनरल मॅनेजर General Manager
– मीटिंग अँड इव्हेंट प्लॅनर Meeting & Event Planner
– फूड अँड सर्विस मॅनेजर Food and Service Manager
– केटरिंग ऑफिसर Catering officer
– सेल्स मॅनेजर Sales Manager
– ह्यूमन रिसोर्स असिस्टंट Human Resource Assistant
५. फॉरेन लँग्वेजेस कोर्सेस Foreign Language Courses –
फॉरेन लँग्वेजेस कोर्सेस जसे की जपानीज, स्पॅनिश, जर्मन यांसारख्या कित्येक फॉरेन लँग्वेजेसचे कोर्सेस बारावी झाल्यानंतर करू शकता.
नोकरीच्या संधी –
– फॉरेन लँग्वेज इन्स्ट्रक्टर Foreign Language
– ट्रान्सलेटर Translator
– कंटेंट एडिटर Content Editor
– इन्स्ट्रक्टर Instructor
– स्क्रीन रायटर Screenwriter
६ . ॲनिमेटर ( Animator ) –
बारावीनंतर BCA / BFA (Animation)/ B. Sc Animation हा कोर्स करून चांगले करिअर करता येऊ शकते. ॲनिमेटर म्हणून ग्राफिक्स डिझाईन तसेच व्हिज्युअल तयार करू शकता तसेच जाहिराती, मुव्हीज ,वेगवेगळे शो, सोशल मीडिया ,वेबसाईट ,गेम या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करता येऊ शकते.
७. बॅचलर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम Bachelors in Travel and Tourism –
बॅचलर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा देखील एक युनिक कोर्स सुद्धा बारावी झाल्यानंतर करता येतो. करिअर करण्यासाठी पुढील संधी उपलब्ध आहेत –
– टुरिझम ऑफिसर Tourism officer
– टूर मॅनेजर Tour manager
– ट्रॅव्हल गाईड Travel host/guide
– ट्रॅव्हल एजंट Travel agent
– केबिन क्रु Cabin crew
– ट्रॅव्हल कन्सल्टंट Travel consultant
– ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजर Travel agency manager
८.न्यूट्रिशनीस्ट किंवा डायटीशन Nutritionist / Dietitian –
हल्ली फिटनेस बद्दल लोक जास्त प्रमाणामध्ये जागरूक झाले आहेत त्यामुळे डायटीशन किंवा न्यूट्रिशनीस्ट या क्षेत्रामध्ये करिअर करणे फायदेशीर ठरू शकते.
B.Sc in Nutrition and Dietetics किंवा B.Sc in Home science हे कोर्सेस करून न्यूट्रिशनीस्ट किंवा डायटीशन बनता येऊ शकते.
९. डेटा सायंटिस्ट Data Scientist –
B.Sc degree in computer science किंवा data science artificial intelligence यामधून डिग्री घेऊन डेटा सायंटिस्ट बनता येऊ शकते. हल्ली बऱ्याच कंपन्यांमध्ये डेटा सायंटिस्टची मागणी असते.
१०. डिप्लोमा इन फिल्म मेकिंग Diploma in Film Making –
बारावी केल्यानंतर फिल्म मेकिंग मध्ये सुद्धा करिअर करता येऊ शकते यासाठी डिप्लोमा इन फिल्म मेकिंग हा कोर्स करावा लागतो –
– कॅमेरा प्रोडक्शन असिस्टंट Camera Production Assistant
– मोशन कंट्रोल ऑपरेटर Motion Control Operator
– कॅमेरा ऑपरेटर Camera Operator
– कॅमेरा असिस्टंट Camera Assistant
अशाप्रकारे हे काही युनिक करिअर ऑप्शन्स ( unique career options after 12th) आहेत की जे आपण बारावी झाल्यानंतर करू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार क्षेत्र नक्कीच निवडू शकतो.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |